सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाळू व दारू तस्करीत सामील असलेल्या दहा इसमांना जिल्ह्यातून हद्दपार केल्याची माहिती रविवारी रात्री उशीरा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे. पंकज पांडूरंग कोळेकर (टोळी प्रमुख), हिंमत अनिल कोळेकर, विनोद अर्जुन कोळेकर, संतोष दगडू चव्हाण, आकाश ऊर्फ अक्षय भगवान घाडगे, धनाजी रामचंद्र शिरतोडे, महेश दिगंबर शिंदे, सोमनाथ अरुण लोंढे यांना हद्दपार करण्यात आले आहे.