भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या सणाची सुहासिनी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनी वटवृक्षाचे मनोभावे पूजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी कामना करीत असतात. वटपौर्णिमेचे औचित्य साधून ११ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास खैरी घर येथील सरपंच वर्षा सेवक कोरे यांच्या पुढाकाराने वैष्णवी ग्राम संघातील महिलांची सभा पार पडली. या सभेमध्ये महिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली सोबतच त्या सोडविण्याविषयी देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.