दक्षिण मध्य रेल्वेच्या हैद्राबाद विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रेल्वे मार्ग पाण्याखाली जावून रुळावरुन पाणी वाहत असल्यामुळे हैद्राबाद नांदेड मार्गावरील वाशिममध्ये मार्गे धावणार्या अनेक रेल्वेगाड्या आंशिक रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती दि. 28 ऑगस्ट रोजी रेल्वे विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाड्यांची स्थिती तपासून घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.