शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या माजळ येथील विशाल बाळकृष्ण माजळकर (वय ३५ वर्ष) या तरुणाचा मृतदेह आज शनिवारी २० सप्टेंबर रोजी कोंड्ये- झापडे धरणात आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून विशालची आत्महत्या की तो बुडाला? या चर्चांना पेव फुटले आहे. लांजा तालुक्यातील माजळ गावातील माजळकरवाडी येथील विशाल बाळकृष्ण माजळकर (वय ३५) हा लांजा येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. विवाहित असलेल्या विशाल याला दारूचे व्यसन होते अशी देखील घटनास्थळी चर्चा सुरू होती.