राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कोपरी पाचपाखडी विधानसभेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ च्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले आहे. एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे.