संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मराठा आंदोलकांना ढेकूण म्हणायचा नालायकपणा केला आहे. यापूर्वीही संजय राऊतांनी मराठा समाजाच्या शांततापूर्ण मोर्चांना मुकामोर्चा म्हणत त्यांचा अपमान केला होता. मराठा आंदोलक ढेकून नाही तर संघर्षयोद्धे, ते आपली न्याय मागणी मांडण्यासाठी आंदोलन करत आहेत. मराठा आंदोलकांना ढेकूण म्हणणं हे महाराष्ट्र आणि आमचे मराठा बांधव सहन करणार नाहीत. अशी टीका आज शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना इशारा दिला.