कळमनुरी शहरात नवीन बसस्थानक परिसरात महात्मा फुले पुतळा परिसरात दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनी ओबीसी नेते प्रा . लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सावंगी भुतनर या गावासह विविध ठिकाणी ओबीसी समाज बांधवांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .एवढी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांची उपस्थिती होती .