कळमनुरी तालुक्यातील मौजे चिखली येथे पत्नीच्या फोनवर मेसेज केल्यावरून वाद होऊन आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांड्याने वार करून डोके फोडून जखमी केले,शिवाय कुऱ्हाडीने तोडून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.5 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.