सोलापूर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर या कायम असून १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस १२ चिटणीस, एक कोषाध्यक्ष एक कार्यालयीन प्रमुख, एक प्रसिध्दी प्रमुख, ६० कार्यकारणी सदस्यांची निवड भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी बुधवारी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केली. या निवडीत युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणुन डॉ. किरण देशमुख ऐवजी विजय दशरथ कुलथे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. तर महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणुन विजया वड्डेपल्ली ऐवजी रंजिता चाकोते यांची वर्णी लागली आहे.