चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन यांनी दाताळा रोडवरील मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन स्थळाची पाहणी केली व विसर्जन सोहळ्याची पूर्वतयारी व नियोजनासंदर्भात चर्चा करून आढावा घेतला. याप्रसंगी मनपा उपायुक्त श्री. मंगेश खवले, शहर अभियंता श्री. रवींद्र हजारे, सहायक आयुक्त श्री. संतोष गर्गेलवार, उपअभियंता श्री. रवींद्र कळंबे, वैष्णवी रिठे, प्रगती भुरे, डॉ. अमोल शेळके, पोलीस प्रशासनाचे व मनपा प्रशासनाचे विविध अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.