यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची साधी मागणी आहे की किमान दसऱ्यापूर्वी किंवा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत जाहीर करावी,ओला दुष्काळ जाहीर करावा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दिलेला कर्जमाफीचा शब्द पूर्ण करावा.आम्ही शेतकरी चळवळीच्या माध्यमातून सातत्याने हे सांगत आलो आहोत अशी मागणी प्रा.पंढरी पाठे यांनी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजता केली आहे.