दक्षिण नागपुरातील सर्वात मोठ्या नोटिफाईड स्लम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाजगी जमिनीवर वसलेल्या सावित्रीबाई फुलेनगर ला मालकी हक्काचे पट्टे द्यावे या मागणी करिता आज संविधान चौकातून मुख्यमंत्री सचिवयालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. जर येत्या दोन महिन्यात सावित्रीबाई फुलेनगर ला मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही तर या 5000 च्या वर लोकसंख्या असलेल्या वस्तीचे मतदार येत्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर जाहीर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.