बुलढाणा शहरातील ओंकार लॉन, धाड नाका येथे 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बुलढाणा-मोताळा विधानसभा प्रशिक्षण कार्यशाळा आमदार संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, प्रवीण जाधव, देवा दांडगे, तहसीलदार मोताळा हेमंत पाटील, भारसाखळे (BDO मोताळा), तायडे (BDO बुलढाणा) आदी उपस्थित होते.