जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा पंधरवाडा' आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध शासकीय योजना आणि प्रशासकीय कामे लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.