राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, सर्व सेल आणि विभागांचे प्रभारी आमदार रोहित पवार यांनी आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास प्रदेश कार्यालय, मुंबई येथील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ‘हजारो कोटींच्या सिडको जमीन गैरव्यवहाराचा’ प्रसार माध्यमांसमोर पुराव्यांसह उलगडा केला. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश उपाध्यक्षा भावना घाणेकर व विकास लवांडे हेदेखील उपस्थित होते.