मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल करीत असताना टायर फुटून 2 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका पोलीसाचा मृत्यू झाला आहे तर दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात नवल वसावे या पोलीस कॉन्स्टेबल मृत्यू झाला तर प्रकाश जाधव व अनिल पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.