माण तालुक्यातील सकल मराठा विद्यार्थी संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणा साठी दहिवडी येथे आज शनिवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळ अकरा वाजता विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. शालेय पोशाखामध्ये या मोर्चामध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच हलगीच्या कडकडाटात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा बस स्थानक मार्गे तहसीलदार कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.