बुधवार रोजी घनसावंगी तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा कुंभार पिंपळगाव येथील साई इंटरनॅशनल शाळेच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडल्या. 14 वर्षाखालील 21 आणि 17 वर्षा खालील 20 संघांनी अधिकृत नोंदणी करून एकूण 28 शाळेच्या संघांनी उपस्थिती नोंदवून उत्कृष्ट सहभाग नोंदवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासेगाव आणि देवी रेणुका माध्यमिक विद्यालय देवी दहेगाव यांच्यातील 14 वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात मासेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलींनी विजय मिळवला.