डोंबिवलीमध्ये आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास झालेल्या दहीहंडी उत्सवात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या फाउंडेशनतर्फे सम्राट चौक येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी खास भेट देऊन आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी जय जवान गोविंदा पथकाने दहा थरांची भव्य दहीहंडी फोडली. दीपेश म्हात्रे यांनी सामाजिक बांधिलकी जपत कर्णबधीर आणि महिला गोविंदांसाठी स्वतंत्र दहीहंडी उभारली होती.