वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी मेघे परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता हैदोस चिंतेचा विषय बनला आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुले आणि महिलांमध्ये, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी युवा संघर्ष सामाजिक संघटनेने पुढाकार घेत ग्रामपंचायत पिपरी मेघेला नुकतेच एक निवेदन दिले असल्याचे आज 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे