गुरुदेव स्पोर्टिंग क्लब, कृष्णानगर यांच्या वतीने आयोजित ग्रामीण स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन आमदार मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कला, कौशल्य आणि मेहनतीला दिशा देण्याचे कार्य अशा स्पर्धांमधून घडते. खेळामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि संघभावना वाढीस लागते.