धुळे तालुक्यातील देऊर येथून अपहरण झालेल्या १५ वर्षीय मुलीची गुजरातमधील सुरत शहरातून सुखरूप सुटका करण्यात धुळे पोलिसांना यश आले. १९ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे. १९ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत ही कारवाई केली. पीडितेला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.