धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवारामध्ये गेल्या दोन दिवसापासून वाघाचा मुक्त संचार असल्याचे दिसून येत आहे. वाघाच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ सहा सप्टेंबर पासून चार वाजल्यापासून सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल होत आहे. या वाघाला पकडण्यासाठी 5 सप्टेंबर रोजी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे व पिंजरे ही लावलेले आहेत.