विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होताच, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधिक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल व भाजपा जिल्हाध्यक्ष पुरषोत्तम चितलांगे यांनी हेडा परिवाराच्यावतीने आयोजित महाप्रसादाचे दि. 06 सप्टेंबर रोजी दुपारी महाप्रसादाचे वितरण केले. गणेश विसर्जनाचा दिवस असल्याने संपूर्ण वाशिम जिल्ह्यातून तसेच शहरातील भक्तगण मोठ्या प्रमाणावर मिरवणूकीत सहभागी होवून आनंद घेत आहेत.