दुर्वास पाटील ने केलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी पोलिसांनी युद्ध पातळीवर वर सुरू केला आहे. मुख्य आरोपी दुर्वास आणि त्याचे तीन सातीदार सध्या पोलीस कोठडीत आहेत. ज्या ठिकाणी दोन खून झाले तो सायली बार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आला आहे. तर दुर्वाचे वडील दर्शन पाटील यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.