पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस भाजप ’सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करणार आहे. या मोहिमेद्वारे पक्ष पंतप्रधानांची ’सेवक’ म्हणून प्रतिमा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) या कालावधीत चालणार्या या मोहिमेअंतर्गत भाजप देशभरात रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण आणि प्रदर्शन असे कार्यक्रम आयोजित करेल. याद्वारे मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.