आज दिनांक 10 सप्टेंबर सकाळी आठ वाजता छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंजजवळ असलेल्या पुलावर मोठ-मोठे खिळे मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या खिळ्यांमुळे अनेक वाहन पंचर झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली अनेक वाहनचालकांनी हा सगळा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे खिळे मारल्यावर या ठिकाणी महामार्ग प्रशासनाच्या वतीने कुठलेही बॅरिगेट लावण्यात आलेले नव्हते. अज्ञात नागरिकाचा व्हिडिओ व्हायरल