जळगाव तालुक्यातील कंडारी गावात शेतात बकरी शिरल्याच्या कारणावरून एका ७४ वर्षीय वृद्धावर तीन जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना रविवारी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली असून, याप्रकरणी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.