धुळे तालुक्यातील नंदाणे गावातील युवराज सोमा भिल (२७) या तरुणाने १ सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ७ सप्टेंबर रोजी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सोनगीर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून झाली असून पुढील तपास सुरू आहे.