कोपरगाव तालुका हद्दीतील खर्डी गणेश शिवारात नगरपालिकेच्या ३ नंबर तलावाच्या कडेला एका ४० वर्षीय पुरुष जातीच्या इसमाने झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. याबाबत आज २४ ऑगस्ट रोजी तालुका पोलिसांनी माहिती दिली आहे.घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तेथे पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे.