रावणवाडी पोलिसांनी कोरणी रजेगाव पुलाजवळ धाड टाकून युवकाकडून धारदार तलवार जप्त केली आहे ही कारवाई दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक ओंकार धेंडे यांनी ही कारवाई केली आहे आरोपी आरिफ नशीम बॅग वय 40 वर्ष यांनी स्वतःच्या दुकानाच्या मागे अवैधरित्या घातक शस्त्र लपवून ठेवले होते यात 83 सेमी.ची तलवार जप्त करण्यात आली या घटने संदर्भात रावणवाडी पोलिसांनी भारतीय शस्त्र कायदा कलम 4 25 अन्वये गुन्हा नोंद केला.