घिर्णी येथे 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बुद्धविचार साप्ताहिकाचे संपादक शांताराम इंगळे व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू सूर्य महाराणा प्रताप, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिगुरु लहुजी सावळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.