पालघर जिल्ह्यातील वाडा- भिवंडी महामार्गावर नारे गावानजीक ट्रक आणि कंटेनरची धडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ट्रक आणि कंटेनर चालक केबिनमध्येच अडकून पडले होते. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या ट्रक आणि कंटेनर चालकाला केबिनमधून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातीत इतका भीषण होता की, ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे.