रायगड जिल्ह्यातील नागोठाणे येथील नागोठाणे वरवठणे पुलावरून चालक अन्वर अजीज पिंजारी याचा शनिवारी सकाळी तोल गेल्याने तो थेट अंबा नदीपात्रात पडला. त्याला पोलिसांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे अनवर पाण्यात वाहून गेला. अनवर ला शोधण्यासाठी पथक परिश्रम घेत आहे.