आल्लापल्ली ग्रामपंचायतीच्या कथित भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला आहे. माजी सरपंच तथा राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अज्जू पठाण यांच्या नेतृत्वाखाली, आल्लापल्ली येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. दि. 11 सप्टेंबर 2025, गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता सुरू झाले.