सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, बोंडगाव देवी यांच्या वतीने निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन निमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, विविध वयोगटातील शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ बोंडगाव देवीचे सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले.