20 ऑगस्टला रात्री आठ वाजताच्या सुमारास सावरगाव येथे राहणाऱ्या कमलाबाई भांगे यांच्या घराला अचानक आग लागली. याआगीत या गरीब बाईच्या घरातील साहित्य व घर पूर्णपणे जळून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आज 21 ऑगस्टला दुपारच्या सुमारास आमदार चरणसिंग ठाकूर व भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली व पंचनामा करत मदतीचे आश्वासन देखील दिले. या महिलेने रडून आपली व्यथा आमदारांसमोर मांडली.