इंदापूर येथील टाटा पावर टी.पी. वर्धमान सुर्या कंपनीच्या गोजवाडा लोकेशन क्र. के.टी. 14, तसेच इतर दोन ठिकाणी ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, गिअरबॉक्स तोडून फोडण्यात आले. यासोबतच पावर सप्लाय केबल आणि तांब्याच्या केबलची तोडफोड करण्यात आली. या घटनेत कंपनीचे तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांचे प्रचंड नुकसान झाल्याची नोंद आहे.