गोंडपिपरी तालुक्यातील अळेगाव येथील एका शेतकऱ्याने बैलपोळ्याच्या पूर्व संधेला शेतात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 22 ऑगस्ट ला सकाळी सात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली गणपत नागापुरे असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडे तीन एकर शेती होती शेतात कापूस सोयाबीन हे पीक लावले होते मात्र आठवडाभर पासून आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात संपूर्ण पीक पाण्याखाली आल्याने ते काही दिवसापासून चिंताग्रस्त होते.याच विवचनेत त्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.