सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हार जीतची बाजी लावून सट्टापट्टी लिहीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत सट्टापट्टी लिहिणाऱ्याला रंगेहात पकडल्याची घटना घडली. ही घटना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पवनी येथील शनिवारी वार्ड येथे घडली. या घटनेत पवनी पोलिसांनी इदाकर महादेव रामटेके (६३) रा शनिवारी वार्ड पवनी यांचे विरोधात पवनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.