आज दि २६ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय ग्रामीण रुग्णालय कन्नड व तालुका अधिकारी कार्यालय यांच्या वतीने तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व अधिकाऱ्यांसह आरोग्य विषयक आढावा बैठक पार पडली. आमदार संजना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आरोग्य सेवा, रुग्णसुविधा आणि भविष्यातील आरोग्यविषयक योजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.