बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा संपूर्ण कर्जमाफी घोषित करण्यात यावी अति पावसामुळे या भागातील पांदन रस्ते वरील अतिक्रमण काढून वरील पांदण रस्ते पक्के करण्यासाठी शासनाने विशेष कार्यक्रम हाती घेण्यात यावा अशा शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.