विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटने 17 नागरिकांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहे. या इमारतीतील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात म्हाडाच्या सदनिका उपलब्ध करून देण्याची मागणी परिवहन मंत्र्यांनी केली होती त्यानुसार महानगरपालिकेकडे विरार येथील म्हाडा संकुलातील 60 सदनिका दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना देण्यातसाठी देण्यात आल्या. आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते 42 सदनिकांच्या चाव्या रहिवाशांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मनपा सहाय्यक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.