देऊळगाव माळी येथे बैलांची मिरवणूक काढून तान्हा पोळा साजरा देऊळगाव माळी येथे ताना पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. बैलां प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. आणि त्याच दुसऱ्या दिवशी ताना पोळा असतो. हा पोळा अतिशय उत्साहात गावामधून 23 ऑगस्ट रोजी सकाळी सुरक्षित अंतर ठेवून बैलांची मिरवणूक काढून गावकऱ्यांनी साजरा केला. यावेळी महिलांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून सर्जा राजाच स्वागत केले व पूजन केले.