मुंबई येथे २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भक्तीभावाने दर्शन घेतले. लालबागचा राजा देशभरातील लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. यावेळी सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो अशी प्रार्थना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बाप्पाच्या चरणी केली.