हिंगणघाट शहरातील माता मंदिर वॉर्ड रोडवर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने गावठी दारू वाहतूकी विरोधात कारवाई करीत १ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे अश्विन सुखदेवे,रविन्द्र घाटुर्ले, राकेश इतवारे, भारत बुटलेकर यांना मोटरसायकलवर गावठी मोहा दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच माता मंदिर वॉर्ड रोडवर नाकेबंदी करून वाहतूक करणाऱ्या इसमास रंगेहाथ पकडून जागीच मुद्देमाल जप्त केला.