राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावे बनावट फेसबुक काढून त्या खात्याचे प्रोफाईलला मंत्री जयकुमार गोरे यांचा फोटो ठेवून त्यांच्या नावे मेसेजद्वारे पैशाची मागणी करत असलेला अज्ञात व्यक्तीविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे हे करत होते. त्यांनी या प्रकरणाचा तपास करुन संशयित वैभव पोपट पानस्कर सध्या रा. सुर्याचीवाडी, ता. खटाव यास त्यांनी अटक केली.