जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे बांधकाम कामगार महिलांसाठी आयोजित केलेल्या भांडी वाटप केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भांडी वाटप होत नसल्यामुळे मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, आज हरतालिका असल्यामुळे अनेक महिलांनी उपवास ठेवला होता, अशा परिस्थितीतही त्यांना सकाळपासून भर पावसात तासनतास वाट पाहावी लागली. अखेर भांडी न मिळाल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.