दरवर्षीप्रमाणे यंदाही आज दि. 31 ऑगस्ट रोजी भाद्रपद महिन्यातील शुध्दपक्षातील अनुराधा नक्षत्रावर शुभमुहूर्त साधून वाशिम शहरासह तालुक्यातील गावोगावी, घराघरात गौरींचे आगमन झाले. परंपरेनुसार आयुडीपी कॉलनी येथे पत्रकार शशीकांत प्रकाश जाधव यांच्या घरी माहेरवासिनी गौरींचे अंत्यत श्रध्दा आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. सोमवारी महाप्रसादाचा नैवेद्य व मंगळवारी गौरी विसर्जन यामुळे भाविकांमध्ये सणासुदीचे उत्साहाचे वातावरण आहे.