राहुरी तालुक्यातील लैंगिक अत्याचारापासून मुलींची सुटका करून सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान खुनाचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या राहुरी पोलिस पथकाचा आज शनिवारी दुपारी स्नेहालयाकडून विशेष सन्मान करण्यात आला आहे. चार अल्पवयीन पीडीतांवर लैंगिक अत्याचार करून तीन पीडित मुलींना डांबून ठेवल्या बाबतची माहिती स्नेहालयाच्या पूजा दहातोंडे यांच्याकडून राहुरी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकाने सदर गुन्हा ताबडतोब उघडकीस आणला होता